जळगाव : शहरातील रस्ते व गटारी विकासासाठी १६२ कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुरेश भोळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जळगाव शहरातील कॉलनी भागातील रस्ते व गटारींची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी अत्यंत जिकरीचे व त्रासदायक झाले आहे. जळगाव शहरांच्या विकास कामांसाठी १६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत यावे अशी मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आमदार सुरेश भोळे यांनी केली आहे.
जळगाव शहरातील कॉलनी परिसरात रस्ते, गटारींची दुरावस्था झाल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व रस्ते, गटारीच्या विकासाकरिता राज्य सरकारने १६२ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. सुरेश भोळे यांनी केली आहे.
लवकरच जळगाव शहरातील विकास कामांना सुरुवात होणार असून, याचा पाठपुरावा स्वतः आमदार सुरेश भोळे हे करणार आहेत.