VIDEO : जळगाव शहरात पिंक रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा द्या ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

जळगाव : शहरातील वाहतुकीत महिलांमार्फत चालविल्या जाणाऱ्या पिंक रिक्षासाठी जळगाव शहर मनपा हद्दीत विविध भागात रिक्षा थांब्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाध्यक्षा महिला महानगर मिनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना मंगळवार, २४  रोजी देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की,  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकर या नुकत्याच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेल्यात. या काळात त्यांनी महिलांसाठी असलेल्या विविध उपक्रमात सहभाग घेतला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जळगाव शहरात महिला चालवत असलेल्या पिंक रिक्षा संघटनेच्या महिलांची देखील त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्या पिक रिक्षाधारक महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यात त्यांना पिंक रिक्षाधारक महिलांना पुरुष रिक्षाधारकांपासून अनेक प्रकारचा त्रास दिला जातो.  यात पुरुष रिक्षाचालकांकडून त्यांच्यासमोर अश्लील टिपण्या केल्या जातात. मुद्दाम भांडण उकरुन काढलं जात. यामुळे या महिलांचे मानसिक संतुलन तर बिघडतेच मात्र अश्याने त्यांचे नैतिक अधःपतन देखील होते. यावरून एक बाब लक्षात आली की, या महिलांना स्वतंत्र थांब्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. कारण या रिक्षांमध्ये खास करून महिला प्रवासी प्रवास करतात. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लक्षात घेता राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.  जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत पिंक रिक्षासाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, टॉवर चौक आकाशवाणी चौक अश्या ५ ठिकाणी रिक्षा थांब्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कार्याध्यक्ष लता मोरे, अर्चना कदम, लता संजय पाटील, कल्पना पाडुरंग निकुम, अरुणा शालीक नेरपगार आदींची स्वाक्षरी आहे.