तरुण भारत लाईव्ह न्यूज : जिल्हा परिषदेसमोर जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील आणि राष्ट्रवादीचे सुरज नारखेडे यांच्यात जि.प.च्या सेसमधील काम वाटपावरून 16 रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हमरी-तुमरी झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर मोठी गर्दी झाली होती.
पंचायत समिती सेसमधील निधीच्या कामात टेंडर का भरले म्हणून जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील यांनी सुरज नारखेडे यांना विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये चांगलाच कलगिरीतुरा रंगला. दोघांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ यांच्या दालनात दाखल होत काम पंचायत समितीच्या सेसचे की जिल्हा परिषदेच्या सेसचे याबाबत विचारणा केली. मात्र
त्याबाबत स्पष्टता झाल्यानंतर काही काळात दोघांमधील वाद शमला. शुक्रवारी काम वाटप समितीची बैठक होती.
यापूर्वीच दुपारी काम वाटपावरून सुरज नारखेडे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठिय्या मांडला होता. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर केला होता.