जळगाव : अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविण्यात आला. याप्रसंगी शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर, संघटन मंत्री मनोज भांडारकर, विवेक जगताप यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
देश ,राष्ट्र, धर्म यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कार्य करत असून सबका साथ सबका विकास या भावनेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला. जळगाव जिल्ह्यातील रावेर,व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ, खा. रक्षा खडसे जाहीर पाठिंबा देत असल्याचे अ. भा. क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर यांनी सांगितले आहे. याप्रसंगी मुकूंद मेटकर, शरदराव बिरारी, प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी, अनिल खैरनार, सदस्य किरण शिंपी, संजय शिंदे,महेश कापुरे, अशोक सोनवणे, सुधाकर कापुरे, गिरीश देवरे, चंद्रशेखर कापडे या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,