---Advertisement---

Pune Crime News : अनैतिक संबंधात अडथळा, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा !

by team
---Advertisement---

Pune Crime News : दिवसेंदिवस गुन्हेगारी कृत्यांमध्ये दर दिवशी भर पडत असतानाच पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात रवींद्र काळभोर नावाच्या व्यक्तीची दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंध ही हत्येमागची मुख्य कारणं ठरल्याची प्राथमिक माहिती तपासातून पोलिसांच्या हाती लागली असून. हादरवणारा घटनाक्रमही समोर आला आहे.

नेमकं काय प्रकरण ?

पुण्यामधील लोणी काळभोर परिसरात राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोणी काळभोर येथील पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. रवींद्र काळभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला, तसेच शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली. यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांकडे वळली. यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सुरुवातीला त्या दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी याप्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर आणि गोरख त्रंबक काळभोर यांना अटक केली आहे. शोभा आणि गोरख यांच्यातील अनैतिक संबंधांना रवींद्र अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला. यानंतर सोमवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करत रवींद्र यांना संपवलं. यानंतरही शोभा आणि गोरख दोघेही काहीच घडले नाही, असे वागत होते. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment