Pune News: पुण्यात काही महिन्यांपूर्वी पोर्श कारचा झालेला अपघात हे प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच पुण्यातील पौड फाट्याजवळ हे प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच पुण्यातील पौड फाट्याजवळ काल रात्री असाच एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
कोथरूड मधील करिश्मा चौकात टेम्पो चालकाने काहींना धडक देऊन जखमी केले. त्यानंतर तसाच पुढे टेम्पो चालवत सिग्नलला उभ्या असलेल्या अमराळे दाम्पत्याला धडक दिली ज्यात गितांजली अमराळे यांच्या अंगावरून टेम्पो गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. अपघात ठिकाणी जवळ असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. श्रीकांत अमराळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा थरार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कोथरून येथील करिश्मा चौकात या ड्रायव्हरने अनेक गाड्यांना धडक दिली. तेथेही काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एवढं होऊनही तो काही थांबला नाही, तो दारूच्या नशेत ट्रक चालवत पुढे गेला आणि अनेक गाड्यांना धडक देत होता. त्यानंतरही त्याने गाडी थांबवलीच नाही तर पुढेच नेली. त्यावेळी तेथे सिग्नलजवळ मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे व त्यांची पत्नी गीतांजली हे उभे होते. आरोपी ड्रायव्हरने दारूच्या नशेत पिकअप ट्रक थेट त्यांच्या अंगावरच चढवला. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.