पुण्यात स्फोट करणाऱ्या अतिरेक्यांच्या एका साथीदाराला अटक

पुणे : पुण्यात स्फोट घडवण्याचा कट रचणार्‍या दोन  अतिरेक्यांना एटीएसच्या पथकाने अटक केल्यानंतर एटीएसने गोंदिया येथे कारवाई करीत, त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. त्याने या दोन अतिरेक्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. या प्रकरणातील आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे.

मागील आठवड्यात पुण्यात दोन अतिरेक्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक माहिती समोर आली. दोन्ही अतिरेक्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

कोथरूड पोलिसांनी धाडसी कामगिरी करीत आठ दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान ऊर्फ अमिर अब्दुल हमीद खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकीला गाडी चोरताना अटक केली होती.

अधिक तपास केल्यांवर हे दोघे वाँँटेड अतिरेकी असल्याचे समोर आले होते. त्यांच्याकडून एक लॅपटॅाप, चार फोन, एक टॅब्लेट काही पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले होते. कोथरूड पोलिसांकडून एटीएसला वर्ग केल्यानंतर या तपासात काही धक्कादायक खुलासे झालेत. दरम्यान, या प्रकरणातील आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे.