जळगाव : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी पाहता मध्य रेल्वेतर्फे पुणे ते विरांगणा लक्ष्मीबाई झाशी या दरम्यान 26 साप्ताहिक स्पेशल सुपरफास्ट गाड्या सुरू होत आहेत. या गाड्या जुलै महिन्यापासूनच सुरू होत आहे. यामुळे प्रवाशांना या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे. मध्य रेल्वे पुणे ते विरांगणा राणी लक्ष्मीबाई झाशी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाड्यांच्या 26 फेर्या चालवणार आहे.
त्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे. यात (01921) स्पेशल गाडी6 जुलै ते 28 सप्टेबरपर्यत दर गुरूवारी दुपारी 3.13 वाजता ही गाडी पुण्यातून सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 9.35 वाजता विरांगणा राणी लक्ष्मीबाई झाशी येथे पोहोचणार आहे. (01922) ही स्पेशल विरांगणा राणी लक्ष्मीबाई झाशी येथून दर बुधवारी 5 जुलै ते 27 सप्टेबरपर्यंत दुपारी 12.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. या गाड्या झाशी ते पुण्याच्या मार्गात दौंडमार्गे, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर येथे थांबणार आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील.