धक्कादायक: 9 महिन्यांच्या गर्भवतीचा फोन चार्ज करताना मृत्यू

मोबाईल मुळे अनेक घटना होतात. त्यातच आता ब्राझीलमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.  कॅम्पिना ग्रांडे येथील एका गर्भवती महिलेला स्मार्टफोन चार्ज करताना विजेचा धक्का लागल्याने जीव गमवावा लागला. तिच्या पतीने सांगितले की, महिला अंघोळ करून फोन चार्ज करत असताना वायरला विजेचा शॉक लागला.

कॅम्पिना ग्रांडे येथे राहणाऱ्या जेनिफर कॅरोलिन नावाच्या 17 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागून या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जेनिफर आणि तिचे न जन्मलेले मूलही वाचू शकले नाही. एका रिपोर्टनुसार, जेनिफरच्या पतीने सांगितले की, जेनिफर आंघोळ करून आली होती आणि एक्स्टेंशन कॉर्डद्वारे फोन चार्ज करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अचानक तारेत वीज आली आणि महिलेचा मृत्यू झाला. तिचा नवरा धावत आत येताच ती जमिनीवर निर्जीव पडली होती.

स्मार्टफोन आपल्या सर्वांच्या आयुष्यात इतका महत्त्वाचा झाला आहे की बाथरूममध्येही फोन हवाच. पण ते किती धोकादायक आहे याचा अंदाज वरील घटनेवरून लावता येतो. अशा परिस्थितीत, आपण नेहमी ओल्या हातांनी कोणतेही इलेक्ट्रिकल काम करू नये याची काळजी घेतली पाहिजे.