---Advertisement---

दुर्दैवी ! कर्तव्य बजावून घरी निघालेल्या शिक्षकावर काळाचा घाला, जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान काल बुधवारी पार पडलं आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. चोपडा तालुक्यातील अनवर्दे-बुधगांव येथे निवडणुकीचे कर्तव्य पार पडून दुचाकीने घरी परतणाऱ्या शिक्षकाचा अपघतात दुदैवी मृत्यू झाला.  लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९, रा. बभळाज, ता. शिरपूर) असे या शिक्षकाचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील अनवर्दे-बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून ते कार्यरत होते. त्याच ठिकाणी त्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. तेथे निवडणुकीचे मतदान आटोपून सायंकाळी दुचाकीने ते घराकडे निघाले होते. गलंगी गावाजवळ रात्री सात वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

या बघतात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment