PV Sindhu Marriage Date: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिचे लग्न ठरले आहे. पीव्ही सिंधू २२ डिसेंबर रोजी उदयपूर येथे हैदराबाद येथील पोसीइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक वेंकट दत्त साई यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. दोन वेळा ऑलिंपिक मेडल जिंकणारी सिंधू लवकरच लग्न करणार आहे.तिच्या वडिलांनी काल, 2 डिसेंबरला सिंधूच्या लग्नाची बातमी चाहते आणि मीडियासमोबत शेअर केली.
पीव्ही सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होते, परंतु एक महिन्यापूर्वीच लग्नाची बोलणी झाली. त्यांनी सांगितले की, “सिंधूचे जानेवारीपासून बॅडमिंटनचे खूप व्यस्त वेळापत्रक असेल, त्यामुळे डिसेंबर लग्नासाठी योग्य महिना आहे. 22 डिसेंबरला उदयपूरमध्ये लग्न होणार असून 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. यानंतर सिंधू तिच्या प्रशिक्षणासाठी परतणार आहे.
कोण आहे वेंकटा दत्ता साई?
वेंकटा दत्ता साई हे Posidex Technologies मध्ये कार्यकारी संचालक आहेत. त्यांचे वडील जीटी वेंकटेश्वर राव हे या कंपनिचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि ते यापूर्वी Indian Revenue Service मध्ये कार्यरत होते.
वेंकटा दत्ता यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एड्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. 2018 मध्ये त्यांनी फ्लेम युनिव्हर्सिटीतून BBA पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये मास्टर्स केले. त्यांनी जेएसडब्लूमध्ये काम केले. डिसेंबर 2019 मध्ये Posidex मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी सावर ॲपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.