---Advertisement---

सर्वच वाहनांना ‘क्यूआरकोड’ अत्यावश्यक,आता अपघातग्रस्तांना मदत, उपचारासह सोयी-सुविधा मिळण्यास सुलभता

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहाने राबविण्यात आला. नवीन वर्षापासून रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रणासाठी ‘सेफ वे रोड सेफ्टी सोल्यूशन इंडिया व शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनद्वारे चारचाकी वाहन, तीनचाकी तथा दुचाकी वाहनांवर इमर्जन्सी क्यूआरकोड’ लावण्याचा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून राबविण्यात येत आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त जखमींना तत्काळ मदत व उपचार यासह त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाला माहिती मिळणे सहज, सोपे व सुलभव्हावे या हेतूने दुचाकी, चारचाकी व अवजडसह सर्वच वाहनांसाठी क्यूआरकोडची निर्मिती करण्यात आली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची विकासकामे झाली आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान या रस्त्यांच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून अनेक वाहनचालक भरधाव वेगाने वाहने हाकतात. यात वाहनचालकाच्या दुर्लक्षामुळे वा चुकीमुळे अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. यात एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास वाहन चालकाची अथवा कारमधील प्रवाशांची ओळख नसल्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची आपत्कालीन मदत मिळण्यास विलंब होतो. तसेच अपघातग्रस्त गंभीर जखमी, बेशुद्धावस्थेत असल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला अपघाताची माहिती मिळण्यास किमान ५ ते ६ तासांचा अवधी जातो. याशिवाय अपघातग्रस्ताची ओळख पटविण्याकरिता पोलिसांना लागणारा कालावधीसुद्धा मोठा असतो. त्यामुळे यावर सर्वच वाहनांना अत्यावश्यक ‘क्यूआरकोड’ चा उपाय शोधण्यात आला आहे .

प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाइल असून त्याला पासवर्ड असतो. त्यामुळे अपघात झालेल्या व्यक्तिव्यतिरिक्त अन्य कोणाला तो मोबाइल उघडता येत नाही. वा सुरू करता येत नसल्याने अपघातग्रस्त व्यक्तींच्या परिवाराशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे सर्वच वाहनांना इमर्जन्सी क्यूआरकोड लावण्यात येत असून अपघात झाल्यास अपघातग्रस्तांचा मोबाइल नंबर कळू शकेल. त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ माहिती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एस.एम.एस. सुविधेचा वापर केला जाणार आहे.

या ‘क्यूआरकोड’च्या माध्यमातून तात्काळ रुग्णवाहिका सेवा १०८ तथा पोलीस प्रशासन सेवेसाठी ११२ सारख्या महत्त्वाच्या नंबरची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहनतळाचा प्रश्न उपस्थित होतो. वाहनं शिस्तबद्ध पद्धतीने लावली जात नाहीत. यावरदेखील आळा घालण्यासाठी क्यूआरकोडमध्ये नो-पार्किंगची माहिती देणारे बटण जोडण्यात आले आहे.
हा क्यूआरकोड कोणत्याही अँड्रॉइड मोबाइलमधून वाहनधारकांना सहजरीत्या स्कॅन करता येऊ शकतो. त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज पडणार नाही. आपल्या जीवाची सुरक्षा आता अत्यावश्यक क्यूआरकोडमध्ये असून क्यूआरकोड प्रत्येक वाहनधारकाने आपल्या वाहनाला बसवावा, असे आवाहन सेफ वे रोड सेफ्टी सोल्यूशन इंडिया व शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख वर्षा पाटील यांनी केले आहे.

राज्य तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २०१९ नंतरच्या सर्वच वाहनांना नवीन नंबरप्लेट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात वाहनाच्या नंबर प्लेटवर क्यूआर कोड चिन्हांकित आहे. यात वाहनाच्या इंजिन नंबर, चेसिस नंबर माहितीसह तसेच वाहन मालकाच्या आधार कार्ड व अन्य माहिती चिन्हांकित आहे. वाहन चोरी, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनासह आपत्कालीन प्रसंगी हे क्यूआरकोड स्कॅन केल्यास त्याच्या माध्यमातून मदत यंत्रणेस संपर्क साधता येऊ शकतो. वाहन मालकांनी २०१९ नंतरच्या वाहनांसाठी नवीन नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई टाळावी.

प्रवीण बागडे, साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment