जळगावात पेट्रोल पंपावर रांगा, काही पंपावरचा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपला !

जळगाव : केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी चार दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या पुरव परिणाम झाल्यानं जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील नायरा पेट्रोल पंप, खाज्यामिया चौकातील इंडियन ऑइल या पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. तर, काही पंप बंद दिसून आले. दीड ते दोन तास थांबल्यानंतर ग्राहकांना पेट्रोल मिळाले.

केंद्र शासनाच्या वतीने वाहन चालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वाहन चालकांनी चार दिवसीय संप पुकारलेला आहे. या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी असल्याने पुढील दोन ते तीन दिवस पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवेल या भीतीनं जग्लोन शहरातील अनेक पेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांनी गर्दी केल्याने अनेक पेट्रोल पंपावरचा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपलेला आहे. तर, काही ठिकाणी शिल्लक असलेल्या पेट्रोल मिळावा यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केलेली आहे.