राधा-कृष्णाच्या भक्तीपायी ‘शबनम’ बनली ‘मीरा’

लखनऊ:  शबनम नावाच्या मुस्लिम महिलेने हिंदू धर्म स्वीकारत आपले नाव मीरा केले आहे. राधा-कृष्णाच्या भक्तीत बुडालेल्या शबनमने वृंदावनला राहण्यासाठी आपले घर सोडले आहे. ती सध्या राधा-कृष्णाची भक्ती करण्यासाठी वृंदावनला एका आश्रमात राहत आहे. शबनम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील जिगर कॉलनी येथील रहिवासी आहे.

तिच्या वडिलांचे नाव इकराम हुसेन आहे.शबनमचे २००० साली दिल्लीतील शाहदरा येथे लग्न झाले होते. मात्र, २००५ मध्ये ५ वर्षांनीच शबनमचा तलाक झाला. तलाक नंतर शबनम पुन्हा एकदा माहेराला राहायला आली. मात्र, ती तिच्या माहेरच्या घरी जास्त काळ राहू शकली नाही. दरम्यान, शबनमला एका खासगी कंपनीत नोकरीही लागली.

तिने काही महिने लेडी बाऊन्सर म्हणून काम केले, पण ते काम आवडले नाही. तिला भगवंताच्या भक्तीत लीन व्हायचे होते.शबनम लाडू गोपाळ (भगवान कृष्णाचे बालस्वरूप) हातात घेऊन वृंदावनला पोहोचली.

शबनमचे म्हणणे आहे की

तिने आपल्या कुटुंबाशी संबंध तोडले आहेत. शबनमने तिचे नाव बदलून मीरा ठेवले आहे. तिला कागदपत्रांमध्ये मीराचं नाव घ्यायचं आहे. मात्र, आजवर असे झालेले नाही. एक ना एक दिवस हे घडेल असा तिचा विश्वास आहे. तिला आपले संपूर्ण आयुष्य कृष्णाच्या भक्तीत घालवायचे आहे, असे तिने सांगितले.