---Advertisement---
मुंबई : भारतविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या एकाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात् एटीएसने आंध्रप्रदेश पोलिसांसोबत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कारवाई करीत अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
तौसिफ शेख असे आरोपीचे नाव आहे. त्याला सोमवारी मालेगाव येथून अटक करण्यात आली होती. आंध्रप्रदेशात दाखल गुन्हयांत त्याचा शोध घेतला जात होता, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्याने दिली. तौसिफ शेख देशाविरुद्ध कट्टरपंथी प्रचार करीत होता तसेच काही विदेशी नागरिकांच्या संपर्कात होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात आंध्रप्रदेश पोलिसांनी यापूर्वी काही जणांना अटक केली होती आणि शेखचा शोध घेतला जात होता. तौसिफच्या ठावठिकाण्याची पक्की खबर आंध्रप्रदेश पोलिसांना होती.