स्वयंसेवकांवरील हल्ल्यामुळे समाजमन अस्वस्थ

#image_title

राजस्थानमध्ये रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांवर झालेल्या चाकूहल्ल्यात आठ जण जखमी झाल्याची बातमी चिंताजनक म्हणावी लागेल. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, त्याची ही घटना द्योतक म्हणावी लागेल. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षाला यावर्षीच्या विजयादशमीपासून प्रारंभ झाला आहे. शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या आणि आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या सेवेकरिता समर्पित केलेल्या संघाच्या स्वयंसेवकांवर राजस्थानसारख्या भाजपाशासित राज्यात, त्यातही राजधानी जयपूरमध्ये चाकूहल्ला व्हावा, ही बाब देशावर प्रेम करणाèयांना अस्वस्थ करणारी तर आहे; पण देशात सर्वकाही ठीक नाही, याचा संकेत देणारीही आहे. जयपूरच्या करणीविहार परिसरातील दसरा मैदानावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. या मैदानाच्या बाजूला असलेल्या शिव मंदिरातील कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर संघाचे स्वयंसेवक या मैदानात शरद पौर्णिमेचा उत्सव साजरा करीत होते. स्वयंसेवकांनी भारतमातेच्या जयजयकाराच्या तसेच जय श्रीरामच्याच घोषणा दिल्या असतील. या घोषणांवर कोणी आक्षेप घेण्याचे कारण नव्हते; पण एका व्यक्तीने आक्षेप घेतला. त्यामुळे स्वयंसेवकांनी महाबली हनुमानाचे स्मरण करत हनुमान चालीसा सुरू केली. यामुळे काही माथेफिरूंचे डोके फिरले. अशाच माथे फिरलेल्या पितापुत्रांनी मैदानात येऊन आधी संघाच्या स्वयंसेवकांशी वाद घातला तसेच नंतर आपल्या जवळच्या चाकूने भोसकाभोसकी सुरू केली. हा प्रकार काही जात्यंध आणि हिंदुद्वेष्ट्या लोकांनी केला असेल, यात शंका नाही. ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्यामुळे तसेच हनुमान चालीसा म्हटल्यामुळे ज्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, त्यांना या देशात कुठेही राहण्याचा अधिकार नाही. त्यांची जागा या देशात नाही तर आपल्या शेजारी देशात आहे. त्यांनी खुशाल भारतमातेचा हा देश सोडून शेजारी देशात जावे, ते आपणहून जात नसतील तर त्यांना भारत सरकारने फटके मारत सन्मानपूर्वक शेजारी देशात पोहोचवून दिले पाहिजे.

चित्रपटात होते, त्याप्रमाणे सर्व झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा नोंदवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. नंतर या मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा प्रकार म्हणजे साप गेल्यावर काठीने भुई धोपटण्यासारखा म्हणावा लागेल. ज्यांना या देशातील बहुसंख्य हिंदू लोकांच्या भावनांचा, श्रद्धास्थानांचा आदर करता येत नाही, त्यांच्यासाठी या देशात जागा नाही. अल्पसंख्यक असूनही बहुजनांच्या भावना दुखावणारे कृत्य करण्याची या लोकांची हिम्मतच कशी होते, आपल्या देशातील गुप्तचर संस्था काय करतात, त्यांना आधीच या घटनाक्रमाची माहिती कशी मिळत नाही, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत. काँग्रेस शासनाच्या काळात अल्पसंख्यकांचे लांगूलचालन केले जात होते. कारण, अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणाच्या आधारावरच देशात काँग्रेसने आताआतापर्यंत म्हणजे २०१४ पर्यंत राज्य केले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारने हिंदुत्वाचे राजकारण करताना अल्पसंख्यकांवरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली. कारण ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या धोरणाने या सरकारची वाटचाल सुरू आहे. मात्र, हिंदूंना डिवचण्याशिवाय देशातील काही शक्तींना चैन पडत नाही. त्यामुळे छोट्या-मोठ्या घटनांतून हिंदू बांधवांना चिथावण्याचा या शक्तींचा प्रयत्न आहे. उत्तरप्रदेशातील बहराईचसह देशाच्या काही भागांत दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे उत्तरप्रदेशसह देशाच्या अनेक भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. बहराईच येथे तर भगवा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात एका हिंदू युवकाचा बळी गेला. त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. अतिशय निर्घृणपणे हालहाल करून त्याला मारण्यात आले. बहुसंख्यकांच्या या देशात अल्पसंख्यक असणारे दादागिरी करत असतील, हिंदूंच्या देव-देवतांची विटंबना करत असतील तर या देशातील हिंदूंनी बांगड्या भरल्या नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू समाज हा भगवान शंकराप्रमाणे आहे. एकदा त्याचे तांडवनृत्य सुरू झाले की, तिन्ही लोकांत प्रलय आल्याशिवाय राहणार नाही. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यपद्धतीप्रमाणे या शक्तींना चिरडून टाकले पाहिजे. या देशातील सर्वच अल्पसंख्यक देशविरोधी आहे असे नाही, पण देशविरोधी अल्पसंख्यकांची संख्याही कमी नाही; ती वाढतच चालली आहे. ज्याप्रमाणे सगळे अल्पसंख्यक हे अतिरेकी नाही, पण सगळे अतिरेकी आणि देशद्रोही हे अल्पसंख्यक आहेत, या ऐतिहासिक तथ्याकडे आपल्याला दुर्लक्षही करता येणार नाही.

 रा. स्व. संघ ही राष्ट्रवादी संघटना आहे. भारतमातेला परम वैभवाप्रती पोहोचविण्यासाठी गेल्या ९९ वर्षांपासून ही संघटना काम करीत आहे. ही संघटना बहुसंख्यक हिंदूंची असली, तरी ती जात-पात, धर्म-भाषा, प्रांत-लिंग असा कोणताही भेद मानत नाही. या देशात राहणारे मग ते आज कोणत्याही जाती-धर्माचे असो, सर्वच हिंदू आहेत, यावर या संस्थेचा ठाम विश्वास आहे. आज जे लोक स्वत:ला दुसऱ्या धर्माचे म्हणवतात, त्यांचे पूर्वजही कधीकाळी हिंदूच होते, असा संघाचा विश्वास आहे. नुसता विश्वासच नाही तर संघ या भावनेने गेल्या ९९ वर्षांपासून काम करत आहे आणि पुढेही काम करणार आहे. देशात कुठेही नैसर्गिक वा अन्य प्रकारची आपत्ती आली तर जात-पात आणि धर्म न पाहता सगळ्यात प्रथम संघाचे स्वयंसेवक धावून जातात आणि नि:स्वार्थ भावनेने पीडितांना मदत करतात, याचा अनुभव देशाने अनेक वेळा घेतला आहे. अशा या संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ला होणे हे समजण्याच्या पलीकडे आहे. आतापर्यंत डाव्याचे प्राबल्य असणाऱ्या केरळमध्ये संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होत होते. त्यात अनेक स्वयंसेवकांना आपल्या प्राणालाही मुकावे लागले. पण तरीही केरळमधील स्वयंसेवक कधी घाबरला नाही आणि त्याने माघारही घेतली नाही. आजही तो केरळमधील डाव्यांच्या दादागिरी आणि गुंडगिरीविरोधात लढत आहे, संघर्ष करत आहे. केरळमधील हे लोण आता राजस्थानपर्यंत आले, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. भाजपाशासित राज्यात संघाच्या स्वयंसेवकांवर होणारे हल्ले हे देशभर वेगळा आणि नकारात्मक संदेश देणारे ठरणार आहेत. त्यामुळे भाजपा सरकारवरची जबाबदारी वाढणार आहे. मुळात कोणत्याही राज्यात भाजपाचे सरकार असो की भाजपाविरोधी पक्षांचे, तेथे संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होणार नाही, याची काळजी तेथील सरकारला घ्यावी लागणार आहे. कारण संघाचे स्वयंसेवक स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी वा स्वार्थासाठी काही करत नाहीत, तर ते जे करतात, ते व्यापक समाजाच्या आणि देशाच्या हिताचे असते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशाला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मोदी देशाला विश्वगुरू बनवतात, ही बाब या देशातील काही लोकांना पचत आणि पटत नसावी. त्यामुळे देशात अशांततेचे तसेच जातीय तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा काही देशविघातक शक्तींचा प्रयत्न राहू शकतो. देशातील सामाजिक सौहार्दतेची वीण कमकुवत करण्याचा या शक्तीचा हा प्रयत्न आहे, यात शंका नाही. जयपूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने देशभरातील हिंदूंमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. पण यामुळे हिंदू समाज रस्त्यावर उतरणार नाही, हिंदू समाजाने रस्त्यावर यावे, अशी इच्छा हा प्रकार घडवून आणणाऱ्यांची नक्कीच असू शकते. पण संघ असे काही करणार नाही आणि संघाचे स्वयंसेवकही असे कधीच करणार नाहीत. आपल्या हाताने आपला देश कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न संघाचे स्वयंसेवक हाणून पाडतील, त्यासाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदानही करतील. देशभक्तीने ओतप्रोत स्वयंसेवक हे संघाचे वैशिष्ट्य आहे. संघ समजून घ्यायचा असेल तर तो दुरून समजणार नाही. त्यासाठी दररोज संघात जावे लागेल. तेव्हाच संघाचे स्वयंसेवक कोणत्या मातीचे तयार झाले, ते समजू शकेल.