राहुल गांधींचा नव्या संसद भवनातील सेल्फगोल

काँग्रेस नेते राहुल गांधी राजकीय सेल्फगोलसाठी प्रसिध्द आहेतच.त्यानी आपली ती खासियत नव्या संसद भवनातील पहिल्या भाषणातूनही  कायम ठेवली आहे. त्याचे असे झाले की, महिला आरक्षण विधेयकावर भाषण करताना  आपण जणू काय आगळावेगळा गौप्यस्फोट करीत आहोत, अशा थाटात त्यानी एक माहिती दिली. केंद्र सरकार कोण चालविते, असा प्रश्न करून स्वतःच नव्वद सेक्रेटरी चालवतात असे उत्तर दिले आणि या नव्वद सेक्रेटरींमध्ये केवळ तीन ओबीसी सेक्रेटरी आहेत, असे उत्तरही  देऊन टाकले.

आपण केवढा महत्वाचा गौप्यस्फोट केला,अशा अविर्भावातच त्यानी आपले भाषण संपविले. त्यांच्यानंतर चर्चेला उत्तर देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा उभे राहिले, तेव्हा त्यानी राहुलच्या भाषणातील पोल खोलली. ते म्हणाले, सरकार कोण चालविणे हे बहुधा राहुल गांधींना ठाऊक नसावे. केंद्रात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असते व ते देशाचा कारभार चालवित असते, हे प्राथमिक ज्ञानदेखील राहुलकडे नसावे आणि ओबीसींचेच म्हणाल तर भाजपने  ओबीसी मोदीना पंतप्रधानपदी बसविले आहे. खासदारात, मंत्रिमंडळात किती ओबीसी आहेत याची आकडेवारीही सादर केली. अशा रीतीने राहुलच्या खात्यात आणखी एका सेल्फगोलची भर पडली.

ल.त्र्यं.जोशी,

ज्येष्ठ पत्रकार, नागपूर  9699240648