Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

मुंबई । विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पदासाठी त्यांनी रविवारी अर्ज भरला होता. त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.

विधानसभा अध्यक्षपदासाठी सुरुवातीला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने ऍड. नार्वेकर यांना प्राधान्य दिले. २०२२ मध्ये भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर नार्वेकर यांची पहिल्यांदा या पदावर निवड झाली होती.

आता दुसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांच्यावर पक्षाचा अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट होते. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती मानले जातात.