जळगाव : २० जुलै राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करत असलेल्या कंटेनरची तपासणीत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने मोठा साठा जप्त केला. मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुलीवर ही कारवाई शनिवार, २० रोजी रात्री करण्यात आली.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या भरारी पथकाला प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत बऱ्हाणपूर चौफुलीवर सापळा लावला होता. गुटखा वाहतूक करणारे कंटेनर (क्रमांक एचआर ५५ एक्यू ३८७३) चालक लियाकत अली इस्लाम खान (रा. मचरोली जिल्हा. मेवात हरियाना) हा घेवून येत होता. पथकाने थांबवून चालकाची विचारपूस केली. त्यानंतर कंटेनरची तपासणी करत छापा टाकला. कंटेनरमध्ये सुमारे एक कोटी सहा लाख १७ हजार ८०० रुपये किमतीचा राज निवास पान मसाला व जाफरानी जर्दा ३० लाख किमतीचा कंटेनर, पाच हजार किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्टचे सतीश शर्मा (रा. दिल्ली), त्यागी (रा. जयपूर तसेच त्याचा हस्तक मुबारक (रा. दिल्ली) कंपनी मालक नीलू पंजाबी उर्फ निशू (रा. भिवाडी राजस्थान) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, पोलीस हवालदार तुषार पाटील, पोलीस हवालदार विक्रांत मांगडे, पोलीस हवालदार विजय बिलगे, पोलीस नाईक प्रमोद मंडलिक, चालक पोलीस शिपाई सुरेश टोंगारे यांनी ही कारवाई केली.