तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । भडगाव शहरात चालू असलेल्या पत्ता जुगारावर सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांच्या पथकाने छापा टाकला. यात तब्बल ४६ हजार ६७० रुपये रोख मिळून आली. या प्रकरणी १२ जणांवर भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
भडगाव शहरात पारोळा चौफुलीजवळ विश्रामगृहाच्या बाजूला एका पत्रीच्या आडोशाला पत्ता जुगार चालू होता. यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांच्या पथकाने छापा टाकला. यात ४६ हजार ६७० रुपये रोख मिळून आली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) प्रमाणे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा छापा स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय कार्यालयातील अमोल पाटील, महेश बागुल, गणेश नेटके, उज्ज्वल म्हस्के, विकास पाटील यांच्या पथकाने कामगिरी केली. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.