देशातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेने ग्रुप डी पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 32,000 हून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत आयटीआयमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. रेल्वेतील ग्रुप डी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३६ असणे गरजेचे आहे.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
रेल्वेत ग्रुप डी भरतीमध्ये इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पदांसाठी भरती असून असिस्टंट लोको शेड, सहाय्यक, पॉइंट्समॅन बी, ट्रॅक मेटेंनर पदांसाठी भरती होणार आहे.
रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीनंतर होणार आहे. यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. त्यांना बेसिक सॅलरी १८००० रुपये असणार आहे. याचसोबत इतर अनेक सुविधा देखील दिली जाणार आहे.