---Advertisement---
जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात त्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून 18 ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात लवकरच पाऊस परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती.
पालघर, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर, विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, असा अंदाज आहे.
20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या बहुतांश भागांत पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची ये-जा असेल. 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. मराठवाड्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
---Advertisement---