Raksha Bandhan 2025: चांदीचे भाव गगनाला भिडले, राख्यांच्या मागणीत वाढ

---Advertisement---

Raksha Bandhan 2025 : बहीण-भावाचे नाते घट्ट करणारी राखी ही काळानुरूप बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रेझ वाढली आहे. तरी सोन्या – चांदीचे भाव लाखांवर पोहोचलेले असतांना देखील अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी जळगावमधील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडेल अशा दरात डिझायनर राख्या सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्या सराफा बाजारात सोने-चांदी तेजीत आहे अशातच चांदी १ लाख १८ हजाराच्या घरात पोहोचली आहे त्यातच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चांदीच्या राख्यांना जास्त मागणी आहे. यात एम्बास, अँटीक वर्क, स्टोन राखी, कुंदन वर्क, पोलकी वर्क अशा विविध प्रकारच्या राख्यांना पसंती दिली जात आहे. तरुणवर्गाच्या मागणीप्रमाणे कमी वजनाच्या आणि दिसायला आकर्षक व सुबक राख्यांना प्रचंड मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगतात. सोन्याची राखी दिसायला तर आकर्षक असतेच, शिवाय ती वर्षानुवर्षे तशीच जपून ठेवली जात असल्यामुळे अशा राख्या घेण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. दिवसेंदिवस वाढते सोन्याचे भाव आणि राखीसाठी मोजलेले पैसे म्हणजे एकप्रकारची गुंतवणूकच असते. यातून सणही साजरा होतो व सोने खरेदीचा आनंदही मिळतो. सोन्याच्या राख्यांमध्ये अनेक डिझाईन आहेत. तसेच चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे.

रक्षाबंधन हा आपला खूपच महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे बहीण आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली राखी शोधत असते. सोन्याच्या आकर्षक आणि कमी वजनाच्या राख्या बाजारात आल्यामुळे नवीन पिढीची मागणी पूर्ण होत आहे. सोन्याचे सर्वांनाच आकर्षण असते. बहिणीने दिलेली सोन्याची राखी भाऊ वर्षानुवर्षे जपून ठेवत असतो. सोन्या-चांदीच्या राख्यांची ही नवीन कन्सेप्ट युवा वर्गात चांगलीच रु ळली असून, या राख्यांची मागणी वाढत असल्याचे नाशिकच्या वेगवेगळ्या सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---