---Advertisement---

Ram Mandir : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ‘या’ संतांना निमंत्रण

---Advertisement---

Ram Mandir | जळगाव : अयोध्या येथील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन संतांना निमंत्रण प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही केवळ जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.

अयोध्या येथे भव्य दिव्य असे श्रीरामांचे अद्वितीय भव्य मंदिर बांधकाम करण्यात आले आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक आनंदायक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ मंदिर संस्थान गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज, अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा श्री वृंदावन धाम पाल येथील श्रद्धेय संत गोपाल चैतन्य जी महाराज आणि स्वामीनारायण मंदिर सावदा येथील कोठारी शास्त्री भक्तीकिशोर दासजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---