Ram Mandir Pranpratistha : जळगावात चौक, उद्यानांमध्ये सजावट आणि रोषणाई

जळगाव : अयोध्यात २२ जानेवारीला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामुळे संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. जळगावात देखील भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे  शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे आकर्षक कटआऊटसह सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर चौक, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात येत आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येणार आहे.

यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती होईल. श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा समारंभ संपन्न होत आहे. यावेळी भारतासह १५० देशातील ३००० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रीत करण्यात आले आहे.