---Advertisement---
अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरातील बांधकाम पूर्ण झाले असून येत्या दिवाळीपासून भाविकांना राम मंदिर परकोटेच्या शेषावतारासह सर्व सहा मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजा करता येणार आहे. एवढेच नव्हे तर राम मंदिराचा दुसरा मजलाही पूर्णपणे तयार आहे. या मंदिरांचे काम पूर्ण स्वरूपात दिसणे ही भाविकांसाठी मोठी दिवाळी भेट ठरणार आहे.
अयोध्येतील रामलला मंदिरासह आता संपूर्ण श्री रामजन्मभूमी परिसरच पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून अखेरचा हात फिरवला जात आहे. ५०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले आहे. दिवाळीपूर्वीच राम मंदिर ट्रस्ट अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांना एक मोठी भेट देणार आहे. १५ ऑक्टोबरपासून भाविक, राम मंदिर परकोटेच्या शेषावतानासह सर्व सहा मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजा करू शकतील. मंदिराचा दुसरा मजलाही पूर्णपणे तयार आहे. फक्त तेथे दरवाजा बसवण्याचेच काम शिल्लक आहे.
आता सहज होईल दर्शन
या दिवाळीपूर्वीच भाविक राम मंदिरात बाल राम तसेच राजा रामाचेही दर्शन करू शकतील. यासंदर्भात ट्रस्टमध्येही विचार विनिमय सुरू झाला आहे. यासंदर्भात राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. १५ ऑक्टोबरपासून भाविकांना इतर मंदिरातही दर्शन आणि पूजेचा लाभमिळू शकणार आहे. या मठ-मंदिरांमध्ये जाण्यासाठी रस्तेही तयार केले जात आहेत. भाविकांना सहज आणि उत्साहाने प्रभूचे दर्शन करता यावे, अशी योजना ट्रस्ट तयार करत आहे.