मोठी बातमी ! विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे भरणार अर्ज ?

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन झालं आहे. आता  विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांना सभापतीपदाची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता दिसत असली तरी, भाजपकडून राम शिंदे यांना हे पद देण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले असले तरी, भाजपने त्यांना विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी निवडण्याचा विचार केला असल्याची माहिती समोर आली आहे. आता राम शिंदे या पदासाठी अर्ज भरतात का हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेतील महायुतीला 237 जागांवर विजय मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत काही अनिश्चितता आहे.

राज्यात कोणत्याही विरोधी पक्षाकडे 29 आमदारांचा संख्याबळ नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. याव्यतिरिक्त, ठाकरे आणि फडणवीस तसेच ठाकरे आणि नार्वेकर यांच्यात झालेल्या भेटींमध्ये या पदाच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कळतेय.