---Advertisement---
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. २७ मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर शोध घेत असताना, ही मुलगी थेट गुजरात राज्यातील मढी रेल्वे स्टेशनवर मिळून आली आहे.
या गंभीर प्रकारानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून गुजरातपर्यंत कोणी आणि कोणत्या उद्देशाने नेले, तसेच यामागे एखादी टोळी आहे का, याचा पुढील तपास आता पोलिस करत आहेत. मुलीच्या सुखरूप सापडण्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे









