---Advertisement---
Ramdas Kadam On Uddhav Thackeray: राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युतीबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अशात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली आहे, या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शीत झाला. मुलाखतीवरुन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रामदास कदम म्हणले की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष, असं आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेतली तर उद्धव ठाकरे यांच राजकारण संपल आहे. दिल्लीत हॉटेल लीलामध्ये काय काय झालं, हे उद्धव ठाकरेंना विचारा. मला सगळं माहितीय, मी वेळ आली की सांगेन,
उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीही म्हणता. हेत उद्धव ठाकरे वेळ आली की पुन्हा पंतप्रधानांच्या पाया पडत मला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा, असं म्हणायचं, असंही कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंपुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे – रामदास कदम
उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना रामदास कदम पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे युतीसाठी राज ठाकरे यांच्या समोर भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. पण, राज ठाकरे काहीही बोलत नाही मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता हा प्रयत्न आहे. महापालिका कशी ताब्यात घेता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असा निशाणाही रामदास कदम यांनी साधला.