ना. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने रामदास पाटलांनी उमेदवारी घेतली मागे

xr:d:DAFtd8oCXa8:2573,j:4806890909061254186,t:24040808

हिंगोली : भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी याकारिता संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे नेते भागवत कराड, श्रीकांत भारतीय त्यांच्यासोबत रविवारी सुमारे तीन तास चर्चा केली. ना. गिरीश महाजन यांची शिष्टाई फलद्रुप झाली आणि रामदास पाटील यांनी आपली उमेदवारी अखेर मागे घेतली.

अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी महाजनांची शिष्टाई
रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उमेदवारीबाबत चर्चा झाली असून त्यांनी योग्य ठिकणी न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद लावली जाईल आणि ४ जूनला बाबुराव कदम विजय होतील, असे रामदास पाटील सुमठाणकर यांनी स्पष्ट केले.

रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावे, याकरिता ना. गिरीश महाजन त्यांची भेट घेतली. रामदास पाटील यांच्या निवासस्थानी तीन तास बंद दारा आड चर्चा झाल्यानंतर त्यांना सोमवारी माघार घेतली आहे. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून बाबुराव कदम यांनी उमेदवारी भरलेली असताना सुद्धा भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती. याचा फटका महायुतीला बसू शकतो, हे लक्षात येताच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी रविवारी रामदास पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.