---Advertisement---

पैशांची बॅग घेऊन पळाले, अवघ्या दोन तासात एलसीबीने घेतले ताब्यात

by team
---Advertisement---

जळगाव : येथे एका गुजरात येथील व्यापाऱ्यास अज्ञात तिघांनी गाडीमधील १ लाख २० हजार रुपयांची बॅग घेऊन पोबारा केला. दरम्यान, एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत दोन तासात तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

सुरतचे व्यापारी हिराभाई किरीट भाई रावल हे भुसावळ येथे व्यावसायिक कामनानिमित्त आपल्या हुंडाई गाडी क्रमांक जीजे 01 आर एल 8188 जात होते.  ते जळगाव येथे दादावाडी या ठिकाणी आले असता येथील आयडीबीआय बँकेच्या  एटीएम समोर थांबले होते. तेवढ्यात तीन जण मोटरसायकलवर आले त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक केले. या गोंधळात दुसऱ्याने गाडीमध्ये असलेली बॅग घेऊन भुसावळच्या दिशेने पळ काढला. त्या बॅगमध्ये १ लाख २० हजार रुपये होते.  दरम्यान, त्यांचे लोकेशन शोधून वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अति वेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला.

एलसीबीच्या टीमपीएसआय दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, सहाय्यक खासदार अतुल वंजारी, पोहे हिरालाल पाटील, राजेश मेढे, चिन्मय पाटील यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण (वय 32 रा. टाहकळी ता. मुक्ताईनगर), राजेंद्र मधुकर जाधव (वय 31), बंडू जेता राठोड (वय 28 मुराझिरा मुक्ताईनगर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटरसायकल व एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment