---Advertisement---

अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार ; पती, सासू-सासऱ्यांसह आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

भुसावळ : तालुक्यातील तरुणाशी दुसऱ्या जिल्ह्यातील एका १६  वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. यानंतर मुल नकोय म्हणून तिचा गर्भपात करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उघड होताच वरणगाव पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळींसह पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वरणगाव शहरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावून देण्यात आले. हि १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकोला जिल्ह्यातील कपाशी येथील आहे. लग्नानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून ती मुलगी गर्भवती राहिली.  मुलं आत्ताच नको म्हणत तिच्यावर सासू-सासरे, आई – वडील व पतीने  दबाव आणत तिचा गर्भपात केला. हा धक्कादायक प्रकार १९ सप्टेंबर रोजी उघड झाला. या प्रकाराविरोधात पीडित मुलीने वरणगाव पोलिसांत २३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, तिचे आई – वडील, सासू-सासरे व पती अशा ५  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment