---Advertisement---

हिंदू असल्याचे भासवून तरुणीवर अत्याचार; बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबीयांनाही धमकी!

by team
---Advertisement---

उत्तर प्रदेशातील अलीगढमधून ‘लव्ह जिहाद’चे एक प्रकरण समोर आले आहे. आकिबने ‘आकाश’ असे भासवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप हिंदू तरुणीने केला आहे. मुलीने लग्नासाठी विचारणा केल्यावर त्याने तिच्यावर इस्लामिक धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तरुणाने बंदूक दाखवून तिला संपूर्ण कुटुंबासह संपवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने बन्नादेवी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पीडितेसोबत अनेक हिंदू कार्यकर्तेही होते. आता याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. राहत खलीलचा मुलगा आकीब हा सराय रहमान मछली गली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. व्हॉट्सॲपवर त्याने हिंदू पीडितेशी मैत्री करण्यासाठी स्वत:ला ‘आकाश’ असे नाव सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले.

विशेष म्हणजे पीडितेला आकाश मुस्लीम असल्याचे जेव्हा कळले तेव्हा तिला धक्काच बसल्याचे पीडितेने सांगितले आहे. यानंतर पीडितेने विरोध केल्यावर आकिब(आकाश)ने तिला आणि तिच्या कुटुंबाला धमकावत बंदुकीच्या जोरावर तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाने पीडितेवर बंदुकीच्या धाकाने तब्बल २ वर्षे अत्याचार केला.

पीडितेने हिंदू संघटनांना याची माहिती दिली असता ही बाब भाजपच्या माजी महापौर शकुंतला भारती यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पीडित महिला आणि हिंदू कार्यकर्त्यांसह त्यांनी बन्नादेवी पोलीस ठाणे गाठत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माजी महापौर म्हणाले की, हिंदू बहिणी आणि मुलींना अडकवून त्यांचे मुस्लिम बनवणे खपवून घेतले जाणार नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment