---Advertisement---
Rashmika-Vijay Wedding: उदयपूरमध्ये एका भव्य आणि देखण्या सोहळ्यात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले. अनेक वर्षांपासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होती, मात्र दोघांनीही त्याबाबत फारसं कधी उघडपणे भाष्य केलं नव्हतं. अखेर राजस्थानातील उदयपूर येथील आलिशान ITC Mementos मध्ये पार पडलेल्या या शाही विवाहाने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली.

सकाळी विजयच्या कुटुंबाच्या पारंपरिक तेलुगू पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. मंत्रोच्चार, पारंपरिक वेषभूषा आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नाची विधी पूर्ण झाली. त्यानंतर संध्याकाळी रश्मिकाच्या कोडावा परंपरेनुसार विधी पार पडले. एकाच मंडपात दोन वेगवेगळ्या संस्कृतींचं सुंदर मिलन पाहायला मिळालं. लग्नस्थळी ‘विरोश’ या नावाचे विशेष डेकोरेशन, फुलांची सजावट आणि भव्य प्रकाशयोजना पाहून संपूर्ण सोहळा एखाद्या चित्रपटातील सेटप्रमाणे भासत होता.
---Advertisement---
लग्नापूर्वी झालेल्या संगीत कार्यक्रमात वातावरण आणखी रंगतदार झालं. रश्मिकाने तिच्या चित्रपट पुष्पा 2 मधील लोकप्रिय गाणे अंगारों वर खास परफॉर्मन्स दिला. आपल्या होणाऱ्या पत्नीचा हा खास डान्स पाहून विजयही भावूक आणि आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं. याच कार्यक्रमात विजयच्या आईने रश्मिकाला त्यांच्या घराण्यातील पारंपरिक सोन्याच्या बांगड्या भेट दिल्या. हा क्षण दोन्ही कुटुंबांसाठी विशेष ठरला.

लग्नानंतर रश्मिकाने सोशल मीडियावर पहिल्या फोटोंसह एक हळवी पोस्ट शेअर केली. तिने लिहिलं की आज ती आपल्या “नवऱ्याची” ओळख जगाला करून देत आहे. विजयने तिला खऱ्या प्रेमाची जाणीव करून दिली, मोठी स्वप्नं पाहण्याची हिंमत दिली आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण बनवला, असं तिने नमूद केलं. शेवटी तिने आनंदाने लिहिलं – “आता फक्त पार्टी करायचीय!”
फोटो शेअर होताच काही मिनिटांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘विरोश’ या नावाने ओळखली जाणारी ही जोडी आता अधिकृतपणे आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.









