---Advertisement---

हिंदू समुदायाला एकत्र आणणे हेच संघाचे उद्दिष्ट, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

by team
---Advertisement---

वर्धमान : हिंदू समुदायाला एकत्र आणणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट आणि कार्य आहे. कारण हिंदू हा देशातील सर्वाधिक जबाबदार समाज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

वर्धमान येथे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. सरसंघचालक म्हणाले, लोक बहुतांश वेळा विचारतात की, आम्ही केवळ हिंदू समाजावरच का लक्ष केंद्रित करतो आणि त्यावर माझे उत्तर हेच आहे की, हिंदू समाज हा देशातील सर्वाधिक जबाबदार समुदाय आहे, जो विविधतेतील एकतेवर विश्वास ठेवून आहे. आज कोणताही विशेष दिवस नाही. मात्र, जे संघविषयी अनभिज्ञ आहेत, त्यांना कायम प्रश्न पडतो की, संघाला नेमके हवे काय आहे? मला याचे उत्तर द्यायचे असेल, तर मी म्हणेन की, संघाला हिंदू समाजाला एकत्र करायचे आहे.

भारत म्हणजे केवळ भूगोल नाही. भारत एक प्रकृती आहे, स्वभाव आहे. काही लोक या मूल्यानुसार राहू शकले नाहीत आणि त्यांनी वेगळा देश निर्माण केला. पण जे राहिले त्यांनी स्वाभाविकपणे हे सार स्वीकारले आणि हे सार काय आहे, तर हा हिंदू समाज, जो जगातील विविधतेचा स्वीकार करून भारताला भरभराटीला आणतो. आपण विविधतेत एकता म्हणतो, पण हिंदू समाज मानतो की, ही विविधता स्वतःच एकता आहे.

डॉ. भागवत म्हणाले, भारतात कोणीही सम्राट किंवा महाराजांचे स्मरण करीत नाही तर त्याऐवजी एका राजाचे स्मरण करते, जो वडिलांच्या वचनासाठी १४ वर्षे वनवासात गेला. हा स्पष्ट संदर्भभगवान श्रीराम यांचा आहे. आणि दुसरे त्याचे स्मरण ज्याने १४ वर्षे भावाच्या खडावा सिंहासनावर ठेवून राज्य केले आणि परतल्यावर त्याला सिंहासन दिले.

ही वैशिष्ठ्ये भारताची व्याख्या करतात. या मूल्याचे पालन करणारे हिंदू आहेत आणि ते संपूर्ण देशाची विविधता एकसंध ठेवतात. आम्ही इतरांना दुखावणाऱ्या कृतींमध्ये सहभागी होणार नाही. शासक, प्रशासक आणि महापुरुष त्यांचे काम करतात, परंतु समाजाने राष्ट्राची सेवा करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही सरसंघचालक म्हणाले.

हिंदू एकतेच्या गरजेचा पुनरुच्चा

हिंदू एकतेच्या गरजेचा पुनरुच्चार करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, चांगल्या काळातही आव्हाने नेहमीच उद्भवतात. वतात. समस्येचे स्वरूप अप्रासंगिक असते, त्यांना तोंड देण्यासाठी आपण किती तयार आहोत हे महत्त्वाचे असते. सद्‌गुणांमध्ये श्रेष्ठ नसलेल्या मूठभर रानटी लोकांनी भारतावर राज्य केले आणि समाजात विश्वासघाताचे चक्र सुरूच आहे. मुळात, भारताची निर्मिती ब्रिटिशांनी केली नाही मात्र, भारताचे विभाजन करण्याची कल्पना त्यांनीच रुजवली होती.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment