---Advertisement---

जळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बाबासाहेबांना अभिवादन

---Advertisement---

जळगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आज सकाळी ८:०० वाजता अभिवादन व मानवंदना देण्यात आली. यावेळी कविवर्य वामन दादा कर्डक यांचे “उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे” हे गीत सर्वांनी मिळून गायले.

या प्रसंगी अभिवादन करण्यासाठी रा. स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, विभाग कार्यवाह स्वप्निल चौधरी, विभाग प्रचारक विकास देशपांडे, शहर कार्यवाह विजय ठाकरे, धर्मजागर गतिविधिचे भाईजी मुंदडा, समरसता मंचचे विजय मोघे व शहरातील अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment