जळगाव : गुढीपाडवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवार, 30 मार्च रोजी शहरात पतसंचलन करुन उत्साह साजरा करण्यात आला. अतीशय शिस्तीतील या पतसंचलनाने शहरवासियांचे लक्ष वेधले. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, तरुण यांच्यासह बाल स्वयंसेवक यात मोठ्या प्रमाणात गणवेशात सहभागी झाले होते. गणपतीनगरापासून पतसंचलनाला सुरुवात झाली. हे पतसंचलन महाबळनगरतर्फे आयोजित करण्यात आले होते. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शहरातील विविध नगरातर्फे हे आयोजन मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले.
शिवकॉलनीनगरातून 100 फुटी रोड शारदाश्रम शाळा, वर्धमान हाईट, पोस्ट ऑफीस, ज्येष्ठ नागरिक संघ, भिकन हिवराळेंचे घर, गणपती मंदीर, हिवराळे चक्की, महाजन गल्ली, मदरसा, शिवकॉलनी स्टॉप, चांदणी चौक गुरुकृपा मैदान या परिसरातून संचलन सायंकाळी पाच ते सात वाजेच्या सुमारास झाले. हरिविठ्ठल नगरात वाघनगर दत्त मंदिर, अमरदिप सोसायटी, परिवर्तन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक कॉलनी, नवनाथ नगर, साईबाबा मंदिर, लक्ष्मीनगर याठिकाणी सकाळी सात नऊ दरम्यान संचलन झाले.
श्रीरामनगरात जळगाव पीपल स्कूल, तरुण कुढापा चौक, नवरत्न चौक, पंतग गल्ली(मोची गल्ली), नवीन बाफना शो रुम सुभाष चौक, भवानी मंदिर, रथ चौक राममंदिर, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक बदाम गल्ली, भाग्यलक्ष्मी चौक, तरुण कुढापा येथे पतसंचलन समारोप झाला.
छत्रपती शिवाजी महाराज नगर साईलीला हॉटेल, पेट्रोलपंप, सत्यमनगर, गजानन नगर कॉलनी,त्रिभुवन कॉलनी,श्रीनिवास दुध केंद्र केसीपार्क गणपती नगरात संचलन झाले.छत्रपती शाहु महाराज नगरात डॉ. शिरीष सहस्त्रबुध्दे यांचा दवाखाना,खान्देश मिल कॉलनी, दत्त कॉलनी, भोलानाथ कॉलनी, साई व्हिजन, डॉ.मनोज चौधरी दवाखाना, आझाद चौक, भवानी चौकाकडे, जाणता राजा चौक, टेकावडे गल्ली, शाहू महाराज मित्र मंडळ, तपस्वी हनुमान, रोझ गार्डनपर्यत. पिंप्राळा नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, सप्तश्रृंगी हॉटेल, हलवाई गल्ली केसरी हनुमान मंदिर,पाटील वाडा, मढी चौक, महाराणा प्रताप चौक, सप्तश्रृंगी मंदिर,धनगरवाडा, शालिनीनगर, रुद्रश्वर महादेव मंदिर, जिल्हा बॅक कॉलनी. अयोध्यानगरात अयोध्या प्रोव्हीजन जांगीड मंदिर गल्ली, ऑटोनगर भाग, सरदार पटेल नगर, शांती निकेतन भाग रायसोनी स्कुल, हनुमान मंदिर, तुप्ती कॉर्नर रोड अशोक नगर गणपती मंदिर. रामेश्वरनगर अशोक किराणा, रामनगर, शिवतांडव मित्रमंडळ शनैश्वर अलंकार श्री सिध्दीविनायक मंदिर गल्ली प्रियंका किराणा, स्वामी समर्थ केंद्र गल्ली, दिनेश किराणा, मोठे हनुमान मंदिर, मराठे गल्ली, राज शाळा गल्ली, साईबाबा मंदिर, विश्वकर्मा नगर, सप्तश्रृंगी मंदिर, संत ज्ञानेश्वर विद्यालय स्वामी समर्थ केंद्र मार्गावर संचलन झाले. पंचमुखी हनुमान नगरात बाबा हरदासराम समाज मंदिर सेवा मंडळ सिंधी कॉलनी समाधा आश्रम, जुनी जोशी कॉलनी नवीन जोशी कॉलनी नाथवाडा भैरव मंदिराच्या बाजुने कंजरवाडा श्रीकृष्ण डेअरी जवळून मेन रोड शेठ फत्रु लक्ष्मण शिंपी समाज वस्तीगृह येथे समारोप झाला.