---Advertisement---
चाळीसगाव : शहरातील हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयाजवळ काल शुक्रवारी (4 जुलै) रोजी एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागी च मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी (5 जुलै ) परिसरातील नागरिकांनी एकत्र येत संतप्त भावना व्यक्त केल्या.
या परिसरात वाढत्या वर्दळीमुळे नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली. या मागणीसाठी नागरिक सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास हिरापूर रोड येथे आंदोलन केले. या आंदोलनाप्रसंगी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन पुकारल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
---Advertisement---
हिरापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली होती. ही बाब लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण हे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी आ. चव्हाण यांनी मध्यस्थीकरीत आंदोलकांची समजूत काढली. याप्रसंगी आ. चव्हाण यांनी या रस्त्यावर आज सायंकाळपर्यँत ठिकठिकाणी गतिरोधक टाकू असे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे नव नियुक्त पोलीस निरीक्षक अमित मनेल व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.