साक्री : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करावा, जैताणे येथील आदिवासी तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागण्यांसाठी धनगर समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजबांधवांनी बसस्थान ते खुडाणे रस्त्यापर्यंत रास्तारोको आंदोलन केले. याप्रसंगी धनगर समाजाचे नेते अशोक मुजगे, शैलेज आजगे यांनी तीव्र भावना व्यक्त करत संताप दर्शविला. या आंदोलनात निजामपूर जैताणे येथील धनगर समाज, हटकर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धनगर समाज महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे, ईश्वर न्याहळदे माजी सरपंच जैताणे, शैलेंद्र आजगे सरचिटणीस भाजपा धुळे, दशरथ शेलार भाजपा शहराध्यक्ष, रविंद्र न्याहळदे, आनंदा सोंजे, अध्यक्ष धनगर समाज जैताणेचे भुराजी पगारे, पोपट न्याहळदे, गोकुळ पगारे, सदस्य ग्रामपंचायत जैताणे, भिका फकिरा न्याहळदे, धाकू कडू न्याहळदे, रघुनाथ पेंढारे, ईश्वर पगारे, भूषण सूर्यवंशी, लहू बोरसे, भगवान भलकारे, केवबा न्याहळदे, कविता अशोक मुजगे, सरपंच ग्रामपंचायत जैताणे, राकेश भलकारे, विजय काटके, सागर बोरसे, भूषण सूर्यवंशी, विकेश बोरसे, मोतीलाल मोरे, नानाभाऊ पगारे, मगन व्यापारे, त्र्यंबक भलकारे, गोकुळ कँखरे, नितीन तराडे, गंगाराम शिरोळे, राकेश पगारे, पंडित बच्छाव, युवराज बोरसे, गुलाब न्याहळदे, ज्ञानेश्वर बच्छाव आदी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.