Raver News : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या नऊ बैलांची रावेर पोलिसांनी सुटका केली. पाल (ता. रावेर) येथील राकेश सुखलाल राजगोडा हा अवैधरीत्या गोवंश जातीच्या गुरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने लालमाती, खिरोदा, रसलपूर या गुप्त मागनि पायी हाकलत घेऊन येत असत्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पो. है. कॉ. सिकंदर तडवी, पोलीस सचिन घुगे, प्रमोद पाटील, महेश मोगरे, योगेश पाटील यांचे पथक पाठविले. आज पहाटे त्यांनी कब्रस्थानजवळ समोरून एक इसम गुरे एकमेकांना दोराने घट्ट बांधून पायी चालत हाकलत घेऊन येताना दिसला. ही खात्री झाल्याने पोलिसांनी गुरे थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना गुरांसोबत असलेला इसम यास हे पोलीस असल्याचे समजल्याने तो पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
गुरांची पाहणी केली असता त्यांच्या अंगावर वेगवेगळ्या जखमा दिसल्या. गुरे कत्तलीच्या उद्देशाने दोराने बांधून पायी हाकलत नेत आहे. म्हणून ही नऊ गुरे ताब्यात घेऊन येथील गोवर्धन गौशाळेत पाठविण्यात आली. रावेर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदशनात हवालदार सिकंदर तडवी हे करीत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेखी, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. सिकंदर तब्बी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, योगेश पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने केली.