---Advertisement---

बसमधून महिलांच्या पर्स चोरीचा गुन्हा उघड करण्यात रावेर पोलिसांना यश

---Advertisement---

एस टी बसमधून महिलांच्या पर्स लांबविणाऱ्या महिलेस २४ तासात शिताफीने सोने चांदीचे दागिने अशा ५० हजारांच्या मुद्देमालासह रावेर पोलिसांनी अटक केली. याबाबतचे वृत्त असे की, येथील गांधी चौकातील नरेंद्र हरी तायडे यांची बहीण ही (दि. ९) रोजी प्रिंपी-नांदू येथून मुक्ताईनगर ते रावेर बसमध्ये बसल्या होत्या. त्या रावेर बसस्थानकात पोहचल्यावर त्यांना त्यांच्याजवळील पर्स आढळली नाही. ती पर्स चोरीस गेली असे निदर्शनास आले.

या पर्समध्ये ४० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सोन्याचे गोल मणी व मंगळसूत्र, २ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे, ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असे एकूण ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात रावेर गुन्हे शोध पथकाने मुक्ताईनगर ते रावेर या संपर्ण रस्त्यांच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. या महिलेबाबत गुप्त बातमीदारांव्दारे माहिती घेण्याचे काम सुरू होते. अखेर या महिलेला तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासात सबळ पुराव्यानिशी निष्पन्न करण्यात आले. या महिलेस गुन्ह्यासंबंधी अधिक चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संशयित आरोपी महिलेस या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून पंचासमक्ष जप्त करून तिला अटक केली. या महिलेस येथील न्यायालयात उभे केले असता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते 7 पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि मीरा देशमुख, गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील महेश मोगरे, संभाजी बिजागरे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---