रावेर शौचालय घोटाळा …आणखी 9 अटकेत

रावेर पंचायत समितीत चर्चेत असलेल्या शौचालय घोटाळ्यात अजून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एकूण 33 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रावेर पंचायत समितीत शौचालय घोटाळ्यात सखोल चौकशी करून अटक सत्र सुरू आहे. भ्रष्टाचार प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात रावेर तालुक्यातील अजून 9 जणांना वेगवेगळ्या गावांमधून रावेर पोलीसांनी अटक केली आहे. यात गोकुळ करुले (अटवाडे), ललित सोनार (निंभोरा), बाळु कोळी (रणगाव), विश्वनाथ कोळी (रायपूर), प्रवीण इंगळे (रावेर), भूषण पाटील (धामोडी), गोकुल रुले (मस्कावद सिम), युवराज बोदडे (निभोरा) आणि रवींद्र पाटील (मोरगाव) अशा 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकुण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शोचालय घोटाळा प्रकरणात अजून मोठे मासे येण्याची शक्यता आहे.