---Advertisement---

‘आता तुम्हाला कळेल…’ रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी तोफ डागली

by team
---Advertisement---

Ravindra Dhangekar : पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना शिंदे गट प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली होती. या चर्चेला कारणही तसच होत, धंगेकर यांनी त्यांच्या WhatsApp स्टेटसवर काही दिवसांपूर्वी भगव्या उपरण्यासह ठेवलेला फोटो आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित राहून तो साजरा केला. उदय सामंत यांनी या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने राजकीय वर्तुळात धंगेकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाची मोठी चर्चा सुरू झाली होती.

आज पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.  रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रकाश सुर्वे हे उपस्थितीत होते. रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले. रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला. ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत. ते १० वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. आता ते पुन्हा स्वगृही आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल, आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? असे चॅलेंज देखील एकनाथ शिंदे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment