RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे देशातील अनेक मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि सीटी युनिअन बँक यांचा समावेश आहे. अश्यातच RBI ने राजस्थानमधील एक बँकेचा परवाना रद्द केला आहे.
राजस्थानातील पाली येथे असलेल्या सुमेरपूर मर्कंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. सुमेरपूर मर्कंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती RBI ने दिली आहे. या बँकेकडे उत्पन्नाचे आणि भांडवलाचे पुरेसे स्रोत नव्हते. अशा परिस्थितीत ग्राहकांचे हित लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या सहकारी संस्थांच्या विनंतीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.
बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर ग्राहकांच्या पैशाचे काय होणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे यासाठी RBI ने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन द्वारे डीआयसीजी कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार प्रत्येक ठेवीदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विम्याचा लाभ मिळेल. बँकेच्या 99.13 टक्के ठेवीदारांना DICGC ठेवींचा लाभ मिळणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.