RBI गव्हर्नर म्हणाले… आजच जमा करा 2,000 रुपयांच्या नोटा

RBI : तुमच्याकडे पण जर अजून देखील 2,000 रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खास. आज बँकांमध्ये नोटा जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची शेवटची तारीख आहे. ही मुदत आज संपणार आहे. ही मुदत 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची होती.

पण नंतर ही मुदत वाढवण्यात आली होती.आरबीआय गव्हर्नर यांनी रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना सांगितले की, आरबीआयकडे अद्याप 2,000 रुपयांच्या 12,000 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की जर कोणाला 7 ऑक्टोबर 2023 नंतरही 2,000 रुपयांच्या नोटा जमा करायच्या किंवा बदलून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे काही पर्याय आहेत.आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आरबीआयची ऑफिसेस आहेत जिथे या 2,000 रुपयांच्या नोटा जमा केल्या जाऊ शकतात.

हे दोन प्रकारे करता येते.
१] सामान्य लोक आणि संस्था RBI च्या 19 कार्यालयांमध्ये जाऊन 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात किंवा जमा करू शकतात. या अंतर्गत, एक्सचेंजसाठी 20,000 रुपयांची मर्यादा आहे, म्हणजेच सामान्य लोक किंवा संस्था या 19 आरबीआय कार्यालयांमध्ये एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात.
२] 2000 रुपयांच्या नोटा भारतीय टपाल किंवा भारतीय टपाल विभागाद्वारे आरबीआय कार्यालयात पाठवल्या जाऊ शकतात.