Bank Open on 31 March: RBI ने एक अधिसूचन जारी केले आहे. या अधिसुचनेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही, सर्व बँका खुल्या राहतील असा आदेश दिला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने, सरकारला सर्व व्यवहारांचा हिशेब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून RBI ने हा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने सरकारी पावत्या आणि देणी हाताळणाऱ्या बँकांच्या सर्व शाखा 31 मार्च 2024 (रविवार) रोजी सुरु ठेवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून आर्थिक वर्ष 2023 मधील पावत्या आणि पेमेंटशी संबंधित सर्व व्यवहार व्यवस्थित ठेवता येतील. असे RBI ने अधिसूचनेत म्हटले आहे.