RBI: तुमच्याकडे पण 2,000 रुपयांच्या नोटा आहेत का? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास 2,000 रुपयांच्या नोटा जमा करणे किंवा बदलणे यासाठी शेवटचे 4 दिवस राहिले आहेत.तुमच्या नोटा जर बँकेत जमा नसतील तर त्या ३० संप्टेंबर आधी जमा करा.
आरबीआयच्या मते, 31 ऑगस्ट 2023 पर्यंत चलनात परत आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.32 लाख कोटी रुपये आहे. 2,000 रुपयांच्या 93% नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत, म्हणजे फक्त 7% नोटा परत आल्या नाहीत. 30 सप्टेंबरनंतर लोक 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत पण आरबीआय कार्यालयात नोटा बदलल्या जाऊ शकतात.पण ही सुविधा आरबीआय कार्यालयात आहे. पण या नोटा बदलण्यासाठी फक्त परदेशी नागरिकांना परवानगी असू शकते.
आरबीआय नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी मुदतही वाढू शकते,एका दिवसात तुम्ही फक्त फक्त 10 नोटा किंवा 20,000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. 23 मे पासून देशातील सर्व बँकांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 2,000 रुपयांच्या नोटा तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केवायसी नियम आणि इतर कायदेशीर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच हे नियम प्रत्येक बँकेनुसार वेगळे आहेत.