Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. या योजनेच्या १५०० रुपयांची महिलांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाकडून अर्ज पडताळणी सुरु असल्याने या हप्त्याला उशीर झाल्याची माहिती आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते सोबत मिळतील अशा चर्चा होती . आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे येत्या 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
हेही वाचा : Pachora News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडू सतत छळ, अखेर विवाहितेने स्वतः ला संपवलं
‘लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.