---Advertisement---

ग्राहकांच्या खिशाला पुन्हा फटका! सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, आजचे भाव काय ?

by team
---Advertisement---

भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. देशांतर्गत बाजारात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ₹86,000 च्या जवळपास व्यवहार करत आहे.

गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या किमती 10% पेक्षा जास्त वाढल्या आहेत, तर या वर्षी आतापर्यंत त्यात 12% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चितता, अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल वाढत्या चिंता आणि डॉलरमधील कमकुवतपणामुळे सोन्याला आधार मिळत आहे.

मंगळवारी सोन्यातील तीन दिवसांची घसरण थांबली आणि मजबूत जागतिक ट्रेंडमध्ये दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ८८,७९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोने आता 90 हजारांच्या टप्प्यात आले आहे. तर चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले होते. तर मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी 490 रुपये, गुरूवारी 600 आणि शुक्रवारी 120 रुपयांनी सोने महागले. तीन दिवसात सोने तब्बल 1200 रुपयांनी आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने गेल्या दोन आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सुरुवातीला चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर बुधवारी 2 हजार, गुरूवारी 1 हजार तर शुक्रवारी 2 हजारांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.त्यामुळे ऐन सण-उत्सवात ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment