जळगाव : बुधवारी (दि. ३०) रोजी सोन्याच्या दराने विक्रमी वाढ नोंदवली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दारात वाढ होतांना दिसत आहे. जळगावच्या सराफ बाजारात आजच्या दिवशी सोन्यात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यासोबतच चांदीच्या दारातही १,००० रुपयांची वाढ झाली आहे.
यामुळे आता २२ कॅरेट सोन्याचे दर ७४,६१९ (जीएसटीसह ७६,८५७) रुपये तर २४ कॅरेट सोने ८१,४०० रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ८३,८४२) वर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदी ९३००० रुपये किलो दरावर स्थिरावले. त
हेही वाचा : ऐकावं ते नवलचं! आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ, सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरही थक्क
नववर्षात १ जानेवारीपासून आतापर्यंत तोळ्यामागे साडेचार हजारांनी महाग झाले आहे. जळगावच्या सराफा बाजारात १ जानेवारीला शुद्ध सोन्याची किंमत ७६,९०० रुपये (जीएसटीसह ७९,२०७) तोळा इतकी होती.
का होतेय सोन्यात दरवाढ?
१ ) भूराजकीय तणाव: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे तणाव वाढला आहे.
२ ) शेअर बाजार अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक म्हणून कल वळवला.
३ ) अमेरिकेतील व्याजदर कमी झाल्याने सोन्यात मागणी वाढली.
४ ) डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांतही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.